सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते खेमचंद बाबू साळुंके यांनी चरित्रपर व्याख्यान दिले. महर्षींनी रचिलेल्या रामायण या महाकाव्यातून श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय तर होतोच तसेच त्यांचे आदर्श चरित्र आपणास आदर्श जीवन जगण्यास मार्दर्शन करते असे साळुंके यांनी आपल्या व्याख्यानात बोलतांना सांगितले. (Maharishi Valmiki Jayanti celebrated at Savitribai Phule Pune University)
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे,शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
