Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

स्कोडा ऑटो वोल्क्सवॅगन इंडियाने पुण्यामध्ये सुरु केले पार्ट्स एक्स्पिडिशन सेंटर

पुणे : स्कोडा ऑटो वोल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल – SAVWIPL) पुण्यातील चाकणमध्ये वोल्क्सवॅगन ग्रुपच्या मुख्यालयात पार्ट्स एक्स्पिडिशन सेंटर (पीईसी) सुरु केले आहे. तब्बल १६८०० चौरस मीटर जागेवर सुरु करण्यात आलेल्या पीईसीमुळे आसियान क्षेत्रामध्ये कंपनीच्या निर्यात कामकाजाचा वेग वाढेल, ज्याची सुरुवात २०२४ मध्ये व्हिएतनामपासून केली जाईल. भारतात तयार करण्यात आलेली किट्स अंतिम उत्पादनासाठी भारतातून व्हिएतनामला निर्यात केली जातील.

प्रोडक्शन अँड लॉजिस्टिक्सचे स्कोडा ऑटो बोर्ड मेम्बर आंद्रेस डिक यांनी सांगितले, “पार्ट्स एक्स्पिडिशन सेंटर सुरु करून आम्ही भारत व व्हिएतनाम यांच्या दरम्यान एक पूल बांधत आहोत व या दोन महत्त्वपूर्ण बाजारपेठांदरम्यान लक्षणीय सिनर्जीचा लाभ घेता यावा यासाठी मंच निर्माण करत आहोत. व्हिएतनाम हा केवळ पहिला टप्पा असून, भविष्यकाळात आसियानमधील अनेक नवनवीन बाजारपेठांमध्ये उत्पादने पुरवण्यासाठी पीईसी सज्ज आहे.”

 

स्कोडा ऑटो वोल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री पियुष अरोरा यांनी सांगितले, “यंदाचे वर्ष स्कोडा ऑटो वोल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी लक्षणीय आहे कारण यावर्षी कंपनीने भारतातून आपली ६,००,००० वी (सहा लाखावी) कार निर्यात केली. भारतातून आम्ही अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना सेवा व उत्पादने पुरवत आहोत, ही बाब आमच्या अभियांत्रिकी क्षमता दर्शवते. पार्ट्स एक्स्पिडिशन सेंटरची स्थापना हे आमच्या निर्यात क्षमतांमध्ये धोरणात्मक प्रगतीमध्ये उचलण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या सेंटरमध्ये आधुनिक पायाभूत सोयीसुविधा व पर्यावरणपूरकता यांचा मिलाप आहे, ज्यामुळे आम्ही नव्याने उदयास येत असलेल्या बाजारपेठांना अधिक सक्षमतेने सेवा पुरवू शकू. पर्यावरणपूरक, दर्जेदार गतिशीलता संपूर्ण जगभर उपलब्ध करवून देण्याचे आमचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

 

भौगोलिक जवळीक साधून सिनर्जीभारतीय सीकेडी (कम्प्लिटली नॉक्ड डाऊनमॉडेल्सची व्हिएतनामला निर्यात

२०२१ साली स्कोडा ऑटोने आपले कुशक मॉडेल भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत दाखल केले, ज्याचे उत्पादन पुण्यात केले जाते. मॉड्युलर ट्रान्सवर्स मॅट्रिक्सच्या एमक्यूबी-ए०-आयएन व्हर्जनवर डिझाईन केलेली आणि आधारित असलेली ही मिड-साईझ एसयूव्ही भारतीयांच्या प्राथमिकता आणि गरजा ध्यानात घेऊन त्यानुसार तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर वर्षभरानंतर स्कोडाने स्लाविया सेडान सादर केली, तिच्या देखील विकासाची मुळे भारतीय आहेत. सीकेडी असेम्ब्ली दृष्टिकोनानुसार ही दोन्ही मॉडेल्स व्हिएतनामला निर्यात केली जातील. संपूर्ण जगभरातील ग्राहकांना दर्जेदार ऑटोमोबाइल्स उपलब्ध करवून देण्याची स्कोडाची वचनबद्धता यामुळे अधोरेखित केली जाणार आहे.

व्हिएतनामला दर वर्षी २७००० कार सेट्स पुरवण्याची सुरुवातीची क्षमता असलेल्या या नवीन १६८०० चौरस मीटरच्या लॉजिस्टिक्स सेंटरमध्ये ही क्षमता एका वर्षात ४०००० कार सेट्सपर्यंत वाढवता येऊ शकेल. निर्यात प्रक्रियेनुसार हे भाग व्हिएतनामला मुंबई बंदरातून पाठवले जातील. अंतिम असेम्ब्ली आणि कस्टमर डिलिव्हरीसाठीची तयारी व्हिएतनाममध्ये क्वांग निन्ह प्रांतात टीसी ग्रुपच्या स्कोडा ऑटोच्या असोसिएटेड फॅसिलिटीमध्ये केली जाईल. व्हिएतनाममधील समर्पित प्रोडक्शन लाईनच्या उभारणीचे काम सध्या सुरु आहे आणि ही प्रोडक्शन लाईन २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading