Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ क्रीडा संचालक प्रा. कुशाबा पिंगळे यांना भाई नेवरेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

कोकणस्थ परिवार पुणे यांच्या वतीने पुरस्कार समारंभाचे आयोजन : प्रा. नानासाहेब फटाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे : कोकणस्थ परिवार पुणे संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ७ वा स्व.भाई नेवरेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा संचालक प्रा. कुशाबा पिंगळे यांना प्रदान आला. नेस वाडिया कॉलेजचे माजी क्रीडा संचालक प्रा. नानासाहेब फटाले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इफा होम सभागृहात पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते  यावेळी पुणे विद्यापिठाचे  क्रीडा संचालक दीपक माने, माजी क्रीडा संचालक एल. टी. देशमुख, ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.  विजय सावंत, शकुंतला पिंगळे, संस्थेचे अध्यक्ष सुनील नेवरेकर, कार्याध्यक्ष नरेश पेडणेकर, सचिव पराग गानू यावेळी उपस्थित होते. सोनिया नेवरेकर यांनी शकुंतला पिंगळे यांचा विशेष सन्मान यावेळी केला.

कुशाबा पिंगळे म्हणाले, भाईंचे काम मोठे आहे. अनेक खेळाडूंना त्यांनी मदत केली आहे, त्यांचाच वसा सुनील नेवरेकर चालवत आहेत. भाई नेवरेकर यांनी कायमच माझ्या कारकिर्दीत मला धीर दिला आहे. भाई नेवरेकर आणि ज्यांनी मला घडविले ते नाना फटाले यांच्या हातून मला पुरस्कार मिळत आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.

सुनील नेवरेकर म्हणाले, क्रीडा, शिक्षण, सार्वजनिक जीवनात समर्पित भावनेने आयुष्यभर स्वतःला वाहून घेणाऱ्या ज्येष्ठ मान्यवर गुरूतुल्य व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणस्थ परिवार पुणे च्या वतीने स्व. भाई नेवरेकर जीवन पुरस्कार देण्यात येतो. प्रा. कुशाबा पिंगळे यांनी त्यांच्या क्रीडा संचालक पदाच्या कारकिर्दीत मुष्टीयुद्ध, कबड्डी तसेच गेली ४० वर्षे विविध क्षेत्रात मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्तरावर अनेक क्रीडापटू घडविले आहेत.

ॲड.विजय सावंत, दीपक माने, एल. टी. सावंत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश रेणुसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading