Monday, June 22, 2026
BusinessLatest News

कोटक म्युच्युअल फंडातर्फे ‘सीखो पैसो की भाषा’ हा गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम पुण्यात सी.बी.एस.इ च्या सहकार्याने राबविण्यात आला 

पुणे : कोटक म्युच्युअल फंडाने सीखो पैसों की भाषा’ हा गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस.इ) सहकार्याने पुण्यात राबविण्यात आला. या उपक्रमामुळे वित्तीय साक्षरतेचा मार्ग मोकळा होणार आहे आणि हे शिक्षकांच्या आर्थिक समजला वाढविण्यास चालना देऊन त्यांना सक्षम करणाऱ्या शिक्षण व जनजागृती कार्यक्रमांची विस्तृत मालिका आयोजित करून केले जाणार आहे आणि शेवटी संभाव्य प्रगतिशील भविष्याच्या दिशेने भारताच्या प्रवासात योगदान देण्यास मदत करू शकेल.

या उपक्रमाने, महाराष्ट्रातील 7575 हून अधिक सी.बी.एस.इ शिक्षक आणि पुण्यातील 2100 हून अधिक शिक्षक यांना आर्थिक साक्षरता शिकविणे आणि त्या बाबतीत जागृती निर्माण करणे, असे उद्दीष्ट ठेवलेले आहे. यापैकी 50% स्त्रिया असणे अपेक्षित असून, समन्यायी वाढ आणि विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आलेला आहे.

उपक्रमाचा एक भाग म्हणून, कोटक म्युच्युअल फंडाने सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग (CIEL) मधील 500 हून अधिक कुशल प्रशिक्षकांना बोर्डात आणले आहे जे प्रभावी सत्रांचे नेतृत्व करतात, याची खात्री करून संपूर्ण कार्यक्रमात गुणवत्ता आणि प्रासंगिकता कायम राहिली आहे.

फरीदा हरियानावाला, मुख्याध्यापिका ऑर्बिस स्कूल, म्हणाल्या की, “कोटक म्युच्युअल फंड आणि सी.बी.एस.इ द्वारे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आमच्या आर्थिक प्रवासात लागणारी मौल्यवान संसाधने, माहिती आणि आवश्यक कौशल्ये या सत्राने शिक्षकांना उपलब्ध करून दिलेली आहेत. गुंतवणुकीच्या अटी समजून घेतल्याने आम्हाला आमची आर्थिक उद्दिष्टे आखण्यास आणि आमचा आर्थिक प्रवास सुरू करण्यास मदत मिळाली.”

डिजिटल बिझनेस, मार्केटिंग अँड अॅनालिटिक्स विभागाच्या प्रमुख किंजल शहा, कोटक म्युच्युअल फंड, म्हणाल्या, “’सीखो पैसों की भाषा’ या गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक सबलीकरण जोपासण्याची वचनबद्धता हाती घेतलेली आहे. देशाच्या भवितव्याला आकार देण्यात (घडविण्यात) आणि नव्या पिढीला घडविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते, असे आम्ही मानतो. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सन्माननीय शिक्षकांना शिकविण्यासाठी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही सी.बी.एस.इ सोबत भागीदारी केलेली आहे. एकत्र येऊन, आर्थिकदृष्ट्या जागरूक शिक्षकांकडून अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत मिळेल, असे भविष्य आपल्याला घडविता येईल.”

देशाच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या आकांक्षासह पूर्णपणे जुळवून घेण्याचे उद्देश्य ठेवून, हा उपक्रम भारताने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सीखो पैसों की भाषा च्या माध्यमातून देशाच्या आर्थिक रचनेला आकार देण्यास मदत होईलअशी आशा करतो.

 

अस्वीकृती

कोटक म्युच्युअल फंडातर्फे एक गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एकवेळेस नो युअर कस्टमर (के.वाय.सी) आवश्यकता पूर्ण करण्याची प्रक्रिया, पत्ता, फोन नंबर, बँक खात्याचा तपशील, इत्यादी, बदलण्याची प्रक्रिया अधिक जाणून घेण्यासाठी https://www.kotakmf.com/iap-disclaimers/ ला भेट द्या. फक्त नोंदविलेल्या म्युच्युअल फंडांसोबतच गुंतवणूकदारांनी व्यवहार केला पाहिजे आणि याची माहिती (www.sebi.gov.in/intermediaries.html) या सेबीच्या वेबसाइटवर पडताळता येईल. कोणत्याही प्रश्नांचे, तक्रारींचे आणि गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यासाठी गुंतवणूकदारांना ए.एम.सी.एस आणि/किंवा गुंतवणूकदार संबंध अधिकाऱ्याशी (इन्व्हेस्टर रिलेशन्स ऑफिसरशी) संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त, ए.एम.सी.एस ने दिलेल्या निकालाच्या बाबतीत गुंतवणूकदाराचे समाधान झालेले नसेल, तर https://scores.gov.in वर तक्रार सुद्धा नोंदविता येईल. स्कोर्स पोर्टल आपल्याला सेबीकडे आपली तक्रार ऑनलाइन नोंदविण्याची आणि नंतर त्याची स्थिती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखीमच्या अधीन असल्याने योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे लक्षपूर्वक वाचावीत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading