विश्वेश्वर बँकेची विविध स्तरावर उत्तम कामगिरी
पुणे : ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कायमच आघाडीवर असलेल्या दि विश्वेश्वर सहकारी बँकेला महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने नुकतेच सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०२२-२३ वर्षासाठी दि विश्वेश्वर सहकारी बँकेस २५०० कोटी ठेवी असलेल्या बँक गटातून सर्वोत्कृष्ट बँक असा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नुकतेच दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेचे उद्घाटन झाले. आजवर बँकेने सर्व उद्दिष्ट साधत, सप्टेंबर २०२३ अखेर एकूण व्यवसायाचा ३१०० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवसायात ३५० कोटी रुपयांनी वाढ केली आहे. याबरोबरच वर्ष २०२२-२३ करीता सभासदांना १० टक्के लाभांश अदा करण्यास बँकेच्या वतीने मान्यता देण्यात आली असून बँकेच्या इंस्टाग्राम व फेसबुक पेजचे उद्घाटन देखील करण्यात आले. लवकरच लातूर येथे बँकेच्य नवीन शाखा सुरु करण्यात येणार असून नजीकच्या भविष्यात एकूण व्यवसाय ₹५००० कोटी पर्यंत नेण्याचा अध्यक्ष गाडवे यांचा निर्धार आहे.
बँकेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एकून २९ शाखा असून पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, वाशी, पंढरपूर आणि सोलापूर शहरातील शाखांचा यामध्ये समावेश आहे.
