पुण्याच्या चित्रकार अद्वैत कोलारकर सन्मानित
पुणे :- हॅशटॅग अनस्टॉपेबल २१ या उपक्रमाच्या अंतर्गत २१ वर्षांखालील २१ प्रतिभावान युवकांना नुकतेच दिल्ली येथे सन्मानित करण्यात आला. यामध्ये पुण्याच्या ९ वर्षीय चित्रकार अद्वैत कोलारकर याचा ही समावेश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. माननीय शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी विज्ञान, क्रीडा, ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, सामाजिक कार्य व उद्योजकता या क्षेत्रातील योगदानाबद्दल अद्वैतसह इतर २० प्रतिभावान युवकांचा सत्कार केला. पुण्यातील अद्वैत याला आपल्या कलात्मक व मंत्रमुग्ध करणाऱ्या चित्रांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळाली आहे. अद्वैतची चित्रे ही विश्व व महासागरांचे सार सहजतेने टिपतात. अद्वैतने वयाच्या ८ महिन्यांपासून चित्रकलेच्याआपल्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हापासून तो सतत चित्रकलामध्ये आपली कौशल्य सुधारत आहे. आत्ता त्याने आपल्या चित्रकलेद्वारे जागतिक ख्याती मिळवली आहे. तसेच त्यांच्या चित्रांच्या विक्रीतून ३ लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाली आहे. शिवाय अद्वैतच्या चित्रांचे प्रदर्शन ही जगभरात भरवण्यात आली आहेत. तसेच २०२० मध्ये ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्डने ही त्याला सन्मानित करण्यात आले होते.
