माविमकडून आयफॅड व बीएमजीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स स्ट्रॅटेजी स्टेकहोल्डर’ या कार्यशाळेचे आयोजन
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा आयफॅड व बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने ‘जेंडर ट्रान्सफर्मेशन मेकॅनिझम’ अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स’ च्या कार्यनिती वर चर्चा करण्याकरिता ‘सेंटर आँफ एक्सेलेन्स स्ट्रॅटेजी स्टेकहोल्डर’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथील हाँटेल प्रेसिंडेंट येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड (भा.प्र.से.), बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मा.श्रीमती विकी वाइल्ड व आयफड च्या नदाया बेल्टचिका यांच्या हस्ते झाले.
या कार्यशाळेस माविमच्या व्यवस्थापकीय संचालक मा.डॉ. इंदू जाखड (भा.प्र.से.) यांनी प्रास्तविक केले. तसेच महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ यांनी माविमच्या एकूण कामाबाबत, कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे यांनी GTM (Gender Transformation Mechanism) व सीईओबाबत तर आयफॅड कन्सल्टंट मा. श्रीमती सरिता राऊत यांनी स्ट्रॅटेजी पेपर चे संक्षिप्त सादरीकरण केले.
यावेळी बोलताना महिला बाल विकास विभागाचे सचिव डाँ. अनुपकुमार यादव म्हणाले, माविम नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत इंटरनॅशनल फंड फाँर अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने GTM (Gender Transformation Mechanism) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून माविम ला येत्या काळात ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स’ म्हणून डेव्हलप करण्यात येणार आहे. तरी यासाठी तयार केलेला स्ट्रँटेजी पेपर स्टेकहोल्डरशी चर्चा करुन अंतिम करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून एक प्रारुप माँडेल देऊन भारताची बुद्धिमता जगाला दाखवण्याची क्षमता असल्याचा मला विश्वास आहे. या प्रकल्पासाठी माविमला मदत करत असल्याबद्दल त्यांनी आयफॅड व बीएमजीएफ च्या प्रतिनिधींचेदेखील आभार मानले.
या कार्यशाळेत वनामती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पर्यटन संचालनालय, कृषी विभाग या शासकीय संस्था, आयआयएम नागपूर, आयआयटी बाँम्बे या शैक्षणिक संस्था, संबोधी, कुडूनबश्री, प्रदान या इतर राज्यातील संस्था, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सीडबी, या बॅंकिंग संस्था, रिलायंस फाऊंडेशन, महेंद्र सीएसआर, टिस या खाजगी संस्था, सोपेकाँम, स्त्रीमुक्ती संघटना, सम्यक, टिसर या स्वयंसेवी संस्था तसेच युएन वुमन, युनिसेफ, जीआयझेड या आंतरराष्ट्रीय संस्थाच्या प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले होते.
महाराष्ट्र इन्फर्मेशन फॉर टेक्नॉलॉजी चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी माविमच्या कामाचे कौतुक करत महिला सशक्तीकरण, स्त्री पुरुष असा भेद न करता समान अधिकार, कुटूंब नियोजनातून महिला सशक्तीकरणाकडे, चौकटीच्या बाहेर जाऊन विचारवृत्ती अशा विविध पैलूंवर आपल्या समारोपीय मनोगतातून प्रकाश टाकला.
या कार्यशाळेची ७ सत्रांत विभागणी करण्यात आली होती. यात प्रामुख्याने ४ गट करुन गटचर्चादेखील करण्यात आली. प्रत्येक गटाने आपले सादरीकरण केले. या सर्व गटांच्या झालेल्या चर्चेचा एकत्रित सार तयार करुन स्ट्रॅटेजी पेपर अंतिम करण्यात येणार असून येणाऱ्या काळात हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन रुपा मिस्त्री यांनी तर आभारप्रदर्शन गौरी दौंदे यांनी केले.
