Wednesday, June 24, 2026
BusinessLatest NewsPUNE

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या ११ व्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : पारदर्शक व्यवहार, उत्तम दर्जा, वेळेत ताबा यासाठी नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील आघाडीच्या बांधकाम कंपनीने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रातील भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे उद्घाटन आज कंपनीच्या प्रभात रस्त्यावरील कार्यालयात संपन्न झाले. उद्घाटन समारंभास पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंद केसरी योगेश दोडके, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लोकमान्य मल्टीपर्पजचे विभाग प्रमुख सुशील जाधव, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे पूनम व विशाल गोखले, सुव्रत देशपांडेयोगिनी पोकळे व अभिषेक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून यावर्षी १५ ते २३ ऑक्टोबर या नवरात्राच्या ९ दिवसांमध्ये  गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या कोणत्याही निवासी किंवा व्यावसायिक प्रकल्पात प्रॉपर्टी खरेदी केल्यास ग्राहकांना ९ टक्के, १८ टक्के किंवा तब्बल २७ टक्के इतकी सवलत मिळवण्याची संधी असेल. शहरातील डेक्कन जीमखाना, प्रभात रस्ता, कर्वेनगर, कोथरूड येथील करिष्मा चौक व सिटी प्राईड समोरील गोखले बिझनेस बे, एरंडवणे, सहकार नगर या भागांमध्ये साकारात असलेल्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांचा यात समावेश आहे.

उद्घाटन प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी लवकरच ‘व्ही रेसिडेन्सेस‘ या प्रीमीयम गृहप्रकल्पांची मालिका सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत उत्तम लोकेशन्सवर उच्च अभिरुची संपन्न जीवनशैली देण्याच्या दृष्टीने सर्व काही सर्वोत्तम देण्याच्या आमच्या प्रयत्न असेल अशी माहिती गोखले यांनी दिली. ते म्हणाले की नजीकच्या भविष्यात मॉडेल कॉलनी, करिष्मा सोसायटी जवळ – कोथरूड व डीपी रोड, कोथरूड या ठिकाणी ‘व्ही रेसिडेन्सेस‘ हे प्रीमीयम गृहप्रकल्प साकारले जातील.

या प्रकल्पांमधील सदकीनांची किंमत सुमारे रुपये ३ कोटींपासून पुढे असेल व साधारणतः मोठ्या आकराच्या ३, ४ व ५ बीएचके असे पर्याय असलेल्या सदनिकांचा यात समावेश असेल. आधुनिक जीवनशैलीला साजेल अशी रचना, जागतिक दर्जाच्या बांधकाम सामुग्रीचा वापर व प्रत्येक ‘व्ही रेसिडेन्सेस‘ प्रकल्पात एक विशेष असा रीक्रिएशन फ्लोअर अशी काही महत्वाची वैशिट्ये या प्रकल्पात असतील असे गोखले म्हणाले.

सध्या गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुमारे २० लाख चौरस फूट निवासी व १५ लाख फूट व्यावसायिक जागांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ज्यामध्ये शहरातील विविध भागात साकारणाऱ्या ३६ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील ५ व्यापारी संकुले असून उर्वरित प्रकल्प हे निवासी आहेत. आजवर गोखले कन्स्ट्रक्शन्सने  १७५ गृहप्रकल्प पूर्ण केले असून ५००० हून अधिक घरांची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading