Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे : श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज नवरात्रीनिमित्त सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात आली. अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून, महाआरती करण्यात आली.

मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त डॉ. गंगाधर श्रीनिवास अनगळ, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ, कार्यकारी विश्वस्त नरेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. नवरात्र उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading