रावेतकर समूहाची ‘घरासोबत इंटेरिअर’ योजना सादर
घराच्या किमतीत समाविष्ट असेल रुपये ३ लाख ते १ कोटी पर्यंतचे इंटेरिअरचे पॅकेज
पुणे : रिअल इस्टेट क्षेत्रातील एक आघाडीचे नाव असलेले पुण्यातील रावेतकर समूह येणाऱ्या सणासुदीच्या काळात घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक लाभदायक योजना घेवून येत आहेत. याअंतर्गत रावेतकर समूहातर्फे शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा निवासी गृहप्रकल्पांमध्ये आपल्या आवडीची सदनिका अर्थात ‘रावेतकर होम’ बुक केल्यास ते इंटेरिअरच्या पर्यायांसह घेण्याची सुविधा उपलब्ध असेल, अशी घोषणा समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर यांनी केली.
रावेतकर म्हणाले, “नवे घर खरेदी केल्यानंतर प्रत्येक घरात इंटेरिअर करायची लगबग सुरु होते. घरातील प्रत्येकाच्या पसंतीने अनेक पर्याय यासाठी पाहिले जातात. हीच प्रक्रिया थोडी सुलभ करीत रावेतकर समूह सर्वोत्तम ब्रँडच्या इंटेरिअरचे पर्याय हे ग्राहकांसमोर ठेवणार आहे. एकूण चार प्रकारांत हे पॅकेज उपलब्ध असणार असून यामध्ये मॉडेल पॅकेज, क्लासिक पॅकेज, फॉर्च्युन पॅकेज आणि फॉर्च्युन प्लस पॅकेज यांचा समावेश असेल. ही पॅकेजेस रुपये ३ लाख ते तब्बल रुपये १ कोटी पर्यंत असतील आणि विशेष म्हणजे घर घेणाऱ्या ग्राहकांना घराच्या किमतीतच ही पॅकेजेस मिळणार आहेत. त्यासाठी वेगळी किंमत दयावी लागणार नाही.”
सदर योजनेचा फायदा हा येत्या सणासुदीच्या काळात म्हणजेच १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत घर घेतल्यास घेता येईल. इंटेरिअरसंबंधी सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा नावलौकिक असलेल्या येरवडा येथील क्रिएटीसिटी मॉलशी यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे घर खरेदीदारांना इंटेरिअर डेकोरेशन संबंधित उच्च दर्जाच्या ब्रँडसमधून आपले घर सजवण्यासाठीच्या आवश्यक वस्तू आणि फर्निचर निवडता येईल. ज्यामध्ये एएलएफ इटालिया फर्निचर, अरांचा, क्युशेन, अॅशली फर्निचर होम स्टोर, कोलंबिनी कासा, डिझाईन कॅफे, ईवोक होम्स, इंडस क्राफ्ट, विमान, टॅन्जेंट, फेबाल कासा, ला झेड बॉय, नटूझी, निर्मिती आणि पेपरफ्राय यासारख्या लोकप्रिय ब्रँडसचा समावेश आहे, अशी माहिती रावेतकर यांनी दिली.
घराच्या किमतीत अंतर्भाव असणाऱ्या या पॅकेजेसची रचना करताना विविध गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. जसे, घर विकत घेतल्यावर भाड्याने देण्यासाठी योग्य असे मॉडेल पॅकेज, कुटुंब घरात रहायला आल्यास योग्य असे क्लासिक पॅकेज, तुम्हाला हव्या तशा जीवनशैलीचा अंतर्भाव करता येईल असे फॉर्च्यून पॅकेज तर फॉर्च्यून प्लस पॅकेजची रचना ही जीवनशैली अधिक उंचविण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे अमोल रावेतकर यांनी नमूद केले.
यंदाच्या सणासुदीत शहराच्या मध्यवर्ती भागात साकारत असलेल्या रावेतकर समूहाच्या ९ निवासी प्रकल्पांमधून आपल्या आवडीचे घर घेतल्यास या पॅकेजेसचा लाभ ग्राहकांना घेता येईल. जान्हवी (लोकमान्य कॉलनी, कोथरूड), ऋषिकेश (भांडारकर रस्ता), आदिती (गुरुराज सोसायटी, कोथरूड), १०० प्रभात (प्रभात रस्ता), अॅस्ट्रीया (औंध), पार्क साईड (पटवर्धन बाग, एरंडवणे), संकेत (उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) या काही प्रमुख प्रकल्पांचा योजनेत समावेश आहे.
रावेतकर समूहाने आजवर ३४ निवासी प्रकल्पांचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले असून यात १००० हून अधिक सदनिका हस्तांतरित केल्या आहेत.
