पीएमपीएमएल च्या मेट्रो फिडर बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रवाशांना मेट्रो स्टेशन पर्यंत ये-जा करण्याकरीता परिवहन महामंडळाकडून मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे अशा मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून सध्या संचलनात असलेले मेट्रो फिडर बससेवा मार्गांचे उत्पन्न, प्रवासी संख्या व ई.पी.के. (earning per kilometre) पुढील प्रमाणे. ( PMPML’s metro feeder bus service has been well received by passengers)
पुणे विभाग – माहे सप्टेंबर २०२३
अ.क्र . मार्ग क्रमांक पासून पर्यंत शेड्युल संख्या उत्पन्न प्रवासी संख्या ई.पी.के
.
१ मेट्रो शटल क्र. २ डेक्कन ते वारजे माळवाडी ०२ २७२०५६ १४९८८ ५७.९०
२ मेट्रो शटल क्र. १३ सिव्हील कोर्ट ते अप्पर डेपो ०३ ३९३११० ३११८७ ५०.५५
३ मेट्रो शटल क्र. १६ पुणे स्टेशन ते मुंढवा गांव ०१ १२०८८५ १०१५१ ३७.६५
४ मेट्रो शटल क्र. १७ शिवाजीनगर ते हडपसर ०१ १८०९२६ ११५०५ ४०.४२
५ मार्ग क्र. २ स्वारगेट ते शिवाजीनगर १४ १३१२१४ १ ११८८१८ २७.९३
६ मेट्रो शटल क्र. के २१ बावधन ते वनाज मेट्रो स्टेशन ०१ १०२८९० ७४७८ ३४.६८
एकूण २२ २३८२०० ८ १९४१२७
पिंपरी-चिंचवड विभाग – माहे सप्टेंबर २०२३
अ.क्र
. मार्ग क्रमांक पासून पर्यंत शेड्युल संख्या उत्पन्न प्रवासी संख्या ई.पी.के.
१ मेट्रो शटल क्र. ३१ पिंपरी मेट्रो स्टेशन ते काळेवाडी फाटा ०१ ७६९१० ६१७५ २४.१२
२ मेट्रो शटल क्र. ३२ नाशिक फाटा ते निगडी ०१ ८६८३० ६६३२ २६.४१
३ मेट्रो शटल क्र. ३५ दापोडी मेट्रो स्टेशन ते पिंपळे सौदागर ०१ ८९७४९ ४४२७ २९.१०
४ मेट्रो शटल क्र. ३७ पिंपरी मेट्रो स्टेशन ते किवळेगांव ०१ ३५१०५ २५९७ ०५.१६
एकुण ०४ २८८५९४ १९८३१
सध्या परिवहन महामंडळाकडून पुणे विभागामध्ये प्रवाशांचा चढ-उतार जास्त आहे अशा मेट्रो स्टेशन येथून एकुण २२ बसेस व पिंपरी-चिंचवड विभागामध्ये ४ बसेस अशा एकुण २६ बसेस संचलनात आहेत. सध्या संचलनात असलेला बसमार्ग मेट्रो शटल क्र. ३७ या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने सदर मार्गात बदल करून पिंपरी मेट्रो स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन असा बदल करून दिनांक ११/१०/२०२३ पासून सुरू करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात रामवाडी पर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर रामवाडी मेट्रो स्टेशन या ठिकाणाहून महामंडळाकडून रामवाडी मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट अशी फिडर बससेवा ई-बसेस व्दारे सुरू करण्याचे नियोजीत असून सरासरी १५ मि. वारंवारितेने बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, सध्या महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या फिडर बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवासी नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
