Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे  : डेक्कन वाहतुक विभागांतर्गत गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

त्यानुसार गांधी क्लासीक अपा. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/३४ पर्यंत तसेच मॅजिस्टीक विल्स पासून पुढे लाईट डीपी शेजारी असलेल्या शेफालीका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading