NSE- गुंतवणुकदारांना सावधानतेचा इशारा
एक्सचेंजच्या असे निदर्शनास आले आहे, की ‘मनोज कुमार’ या नावाची आणि ‘किंग ट्रेडर्स’ नावाने कामकाज चालवणारी व 8838393315 हा मोबाइल क्रमांक वापरणारी व्यक्ती ट्रेडिंग, शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील खात्रीशीर परतावे यांसाठी सिक्युरिटी बाजारपेठेशी संबंधित टिप्स देत असून ट्रेडिंग खाते हाताळण्यासाठी लॉग-इन आयडी/पासवर्ड मागत आहे. ( NSE-Caution to Investors)
एक्सचेंजने आपल्या संकेतस्थळावर https://www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिंकअंतर्गत ‘नो/लोकेट युअर स्टॉक ब्रोकर’ ही सुविधा दिली आहे. या लिंकवर नोंदणीकृत अधिकृत व्यक्तींची माहिती शोधता येऊ शकते. त्याशिवाय या लिंकवर ट्रेडिंग सदस्यांनी एक्सचेंजकडे जाहीर केलेल्या गुंतवणुकदारांकडून/गुंतवणुकदारांना पैसे देण्यासाठी मिळवण्यासाठी जाहीर केलेली ग्राहक बँक खातीही देण्यात आली आहेत. गुंतवणुकदारांनी कोणत्याही व्यक्तीसह व्यवहार करताना तपशील तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करताना गुंतवणुकदारांनी संबंधित तपशील तपासावेत.
गुंतवणुकदारांना अशाप्रकारची कोणतीही योजना/उत्पादन देऊ करणाऱ्या, शेअर बाजारातून खात्रीशीर/सूचक परताव्यांची हमी देणारी व्यक्ती/संस्थेसह व्यवहार न करण्याचा सल्ला एक्सचेंजने दिला आहे, कारण अशाप्रकारची खात्री देण्यास कायद्याने मनाई आहे. सदर व्यक्ती/संस्था नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची नोंदणीकृत सदस्य किंवा नोंदणीकृत अथवा अधिकृत व्यक्ती नाही याची नोंद घ्यावी.
गुंतवणुकदारांनी अशाप्रकारच्या बेकायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ट्रेड करू नये. अशाप्रकारच्या बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकदाराने स्वतःची जोखीम, खर्च आणि परिणामांसह सहभागी होण्याचे एक्सचेंज समर्थन करत नाही अथवा मान्यता देत नाही.
अशाप्रकारच्या प्रतिबंधित योजनांशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास पुढील स्त्रोत गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध असणार नाहीत –
- एक्सचेंजच्या कार्यक्षेत्राअंतर्गत लागू होणारे गुंतवणूकदार संरक्षणाचे लाभ
- एक्सचेंजची विवाद निराकरण यंत्रणा
- एक्सचेंजद्वारे प्रशासित केली जाणारी गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा.
