Saturday, April 4, 2026
BusinessLatest News

मेडीबडीकडील माहिती दर्शवते की, आजार लवकरात लवकर लक्षात येणे ही मधुमेहावरील यशस्वी उपचारांची गुरुकिल्ली आहे

पुणे :  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म मेडीबडीने एक वर्कप्लेस डेटा प्रकाशित केला आहे ज्यामध्ये लवकरात लवकर निदान आणि मधुमेह व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या डेटानुसार, ३२.५% जणांमध्ये मधुमेहपूर्व स्थिती असते तर ११.३१% जणांना मधुमेह असतो. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास, नंतरच्या काळात मधुमेह होण्याची शक्यता कमी होते, मधुमेहपूर्व स्थिती जवळपास एक दशक आधी लक्षात येऊ शकते हे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. मधुमेही रुग्णांपैकी १३.७% पुरुष व फक्त ५.३% महिला होत्या असेही या माहितीमधून आढळून येते.

जगभरातील मधुमेही वयस्कांमध्ये दर सात जणांमधील एक जण भारतीय आहे. टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उच्च दर्जाची आरोग्य देखभाल उपलब्ध झाल्यास प्रतिबंधात्मक काळजी घेऊन आरोग्याला असलेले धोके कमी करण्यात मदत मिळते.  डॉक्टर व रुग्ण यांचे गुणोत्तर प्रमाण जिथे खूपच विषम आहे अशा विकसनशील देशांमध्ये हे उपयोगी ठरू शकते.

मेडीबडीच्या मेडिकल ऑपरेशन्सच्या प्रमुख डॉ गौरी कुलकर्णी यांनी सांगितले, “आरोग्याच्या देखभालीवरील खर्च कमी करण्यात आणि रुग्णांचे आयुष्मान वाढवण्यात, त्यांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात प्रतिबंधात्मक औषधे अतिशय सखोल प्रभाव घडवून आणू शकतात हे आमच्याकडील माहितीवरून दिसून येते. मेडीबडीमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्य देखभाल हा सार्वजनिक आरोग्याचा आधारस्तंभ आहे या विचाराला प्रोत्साहन देतो. आमच्या उद्योगक्षेत्राने प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनाऐवजी अधिक सक्रिय व घरी किंवा कामाच्या ठिकाणी प्राथमिक देखभालीला महत्त्व देणारे मॉडेल स्वीकारले पाहिजे.”

वय आकडेवारी लक्षात घेतली तर दिसून येते की, मधुमेही रुग्णांचे सरासरी वय मधुमेहपूर्व स्थिती असलेल्या रुग्णांपेक्षा खूप जास्त आहे, मधुमेही रुग्णांचे सरासरी वय ५०+ तर मधुमेहपूर्व स्थितीत असलेल्यांचे सरासरी वय २० ते ४० च्या दरम्यान आहे. यांच्यापैकी बहुतांश रुग्ण आमच्याकडे नियमितपणे आरोग्य तपासण्या करून घेतात, या तपासण्यांदरम्यान त्यांना मधुमेह किंवा मधुमेहपूर्व स्थिती असल्याचे आढळून आले होते. यांच्यापैकी बहुतांश रुग्णांनी त्यांच्या नियमित आरोग्य तपासण्यांनंतर आमच्याकडून आरोग्य देखभाल सेवा घेतल्या, ज्यामध्ये त्यांच्या बाबतीत मधुमेह किंवा मधुमेहपूर्व स्थितीचे प्राथमिक निदान करण्यात आले.

प्राथमिक निदान करण्यात आल्यानंतर मधुमेह असलेल्यांपैकी ४०% आणि मधुमेहपूर्व स्थिती असलेल्यांपैकी २५% जणांनी मेडीबडीकडून सेवा घेणे सुरु ठेवले. ७ ते ८ महिन्यांमध्ये, मेडीबडीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन, औषधे, आहारातील बदल आणि व्यायाम यामुळे लक्षणीय सुधारणा घडून आल्या, एचबीए१सी पातळीत १.८% घट आणि बीएमआयमध्ये १ केजी/एम^२ घट आढळून आली. गंभीर सह्व्याधी, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत किंवा अस्थिर मधुमेह असलेल्या केसेसमध्ये रुग्णांना नियमितपणे फिजिकल फॉलो-अपचे महत्त्व समजावून सांगण्यात आले, या सेवा त्यांना नेटवर्क डॉक्टर्सकडून मिळाल्या.

मेडीबडी व्हीहेल्थच्या मेडिकल सर्व्हिसेसच्या उपाध्यक्ष डॉ. प्रीती कुमार गोयल यांनी सांगितले, “गेल्या अनेक वर्षात आढळून आलेला, एक सर्वात जास्त धक्कादायक ट्रेंड म्हणजे मधुमेहपूर्व स्थितीचे निदान होण्याचे वय कमी होत चाललेले आहे. मधुमेहपूर्व स्थिती लवकरात लवकर लक्षात आली व त्यावर योग्य उपचार केले गेल्यास मधुमेह होण्याचे टाळले जाऊ शकते हे यावरून दिसून येते. त्याचप्रमाणे मधुमेहाचे निदान लवकरात लवकर केले गेल्यास आणि त्याचे सक्रिय व्यवस्थापन यामुळे रक्तातील शर्करेची पातळी कमी होण्यात, औषधे घेत राहावे लागण्याची गरज कमी होण्यात आणि काहीही गुंतागुंत होण्याचे टाळण्यात मदत मिळते. डॉक्टर्स आणि क्लिनिकल तंत्रज्ञांची आमची टीम सहजपणे उपलब्ध असते, त्यामुळे रुग्णांना उपचार योजनांचे पालन करण्यात मदत होते, मधुमेहाला प्रतिबंध कसा घालावा, त्यावर नियंत्रण कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले जाते.”

असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे, यामुळे जीवन गुणवत्ता खालावू शकते व आरोग्य देखभाल इकोसिस्टिमवरील ताण वाढू शकतो. कोट्यवधी लोकांना उच्च दर्जाची आरोग्य देखभाल सेवा उपलब्ध करवून देणे हे मेडीबडीचे व्हिजन आहे.  आमच्या प्लॅटफॉर्मवर स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असल्याने या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून तुम्ही तुमची जीवनशैली व आरोग्यामध्ये प्रतिबंधात्मक बदल घडवून आणू शकता. आपण सर्वजण एकजूट होऊन आरोग्य सेवा इकोसिस्टिमवरील ताण कमी करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्य मेट्रिक्समध्ये सुधारणा घडवून आणू शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading