मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर ग्रॅन्टी बसविण्यासाठी उद्या ब्लॉक
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. ४५/००० अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी ४५ / ८०० खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या ( दिनांक १०) रोजी करण्यात येणार आहे. या मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी २.०० या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.०० वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल. असे प्रसहसनांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
