पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा पाच राज्यांतील विधानसभेच्या मतदानाच्या तारखा मुक्रर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. (Assembly election programs in five states announced)
मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे. पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे.
मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत. राज्यनिहास मतदान ः मिझोरम – 7 नोव्हेंबर, छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर, मध्यप्रदेश – 17 नोव्हेंबर, राजस्थान – 23 नोव्हेंबर आणि तेलंगाणा – 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदार यादी 17 ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
