Sunday, August 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

KBC च्या सेट्सवर अमिताभ बच्चन यांनी कबूल केले की….

 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 हा प्रतिष्ठित गेम शो देशाचा महान अभिनेता आणि या कार्यक्रमाचा होस्ट अमिताभ बच्चन यांच्या, 11 ऑक्टोबर रोजी 81व्या वाढदिवसासाठी समस्त देशवासीयांना आमंत्रित करत आहे. या खास प्रसंगाच्या निमित्ताने या भागात अनेक सर्प्राइज असणार आहेत, जी बिग बींचा वाढदिवस अविस्मरणीय करतील.

सुरुवातीला सरोद वादक, पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान गाण्यांची एक मेडली सादर करून वातावरण आल्हाददायक करतील. त्यानंतर सुपरस्टार चिरंजीवी, अनुपम खेर, विद्या बालन, विकी कौशल आणि बोमन इराणी सारखी बॉलीवूडमधली अनेक मान्यवर मंडळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून श्री. बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतील. इतकेच नाही, तर सीझन 11ची करोडपती बबिता तावडे, सीझन 13ची करोडपती विजेती हिमानी बुंदेला आणि सीझन 15चा पहिला करोडपती जसकरण सिंह हे देखील या सोहळ्यात सहभागी होतील आणि त्यांच्या लाडक्या मेगास्टारला हार्दिक शुभेच्छा देताना दिसतील.

या प्रेमामुळे भारावलेले श्री. बच्चन पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, “एरव्ही मी इकडे येणाऱ्या स्पर्धकांना टिशू पेपर देत असतो, पण आता माझ्यावर ती पाळी आली आहे.” आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना नतमस्तक होत ते पुढे म्हणाले, “या मंचावर माझा जो वाढदिवस साजरा होतो, तो सगळ्यात उत्तम असतो.”

गेल्या काही वर्षात अमिताभ बच्चन यांनी लोकांचे हे जे अपार प्रेम मिळवले आहे ते इतक्या वर्षांनंतर देखील त्यांच्याबद्दलचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आणि भारतीय टेलिव्हिजन आणि आपल्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा त्यांचा प्रभाव याची साक्ष देते.

बघायला विसरू नका, कौन बनेगा करोडपतीमध्ये बिग बींच्या वाढदिवसाचा सोहळा 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading