Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांची एरोमॉडेलिंग प्रात्यक्षिके

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वायुदलाच्या 91 व्या स्थापना दिनानिमित्त रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो आयोजित करण्यात आला होता. (Aeromodeling demonstrations of radio controlled aircraft)

उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, बॅनरसह हवाई पुष्पवृष्टी करणारे सेस्ना विमान ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये होती. विमान छंदिष्ट सदानंद काळे आणि त्यांचा मुलगा एरोमॉडेलर अथर्व काळे हा कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), पुणे विभाग, एअर मार्शल श्री. भूषण गोखले आणि श्री. जय भट्टी, ब्रिगेडियर, इंडियन आर्मी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading