Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जी घटना घडली आहे ती सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव व अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेले आहेत. त्यामुळे चौकशीअंती दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

१२७ प्रकारच्या औषधांचा साठा होता
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात १२७ प्रकारच्या औषधांचा साठा होता. विशेष म्हणजे त्याउलट त्या रुग्णालयात नवीन औषधी खरेदीसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला देखील मान्यता दिलेली होती.

परंतु रुग्णांच्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर आहे. दुर्दैवी आहे. झालेल्या संपूर्ण घटनेला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. वैद्यकीय मंत्री व अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. चौकशीअंती या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर जोरदार कारवाई केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मृत्यू कशाने झाले त्यात मी पडत नाही
संबंधित मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत आम्ही प्राथमिक माहिती घेतली आहे. यात विशेष करून काही वयोवृद्ध लोक होते. तर लहान बालकेही प्री-टर्म होती. परंतु त्यात मी आता पडू इच्छित नाही. चौकशीअंती जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading