Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

PMPML – पर्यटन बससेवा क्र. ७ चा  भक्ती शक्ती  येथून शुभारंभ

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून रविवारी  पर्यटन बससेवा क्र. ७ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ मेकॅनिकल इंजिनिअर  रमेश चव्हाण व चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)  सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी तथा कोथरूड डेपो मॅनेजर  अल्ताफ सय्यद, भोसरी डेपो मॅनेजर  विजयकुमार मदगे, पिंपरी डेपो मॅनजेर भास्कर दहातोंडे, न.ता.वाडी डेपो मॅनेजर  संतोष किरवे, निगडी डेपो समन्वयक लक्ष्मण कावली,  उमाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. निगडी भक्ती शक्ती स्थानक येथे वातानुकूलित बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ७ चा शुभारंभ करण्यात आला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या संकल्पनेतून पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत बसेसव्दारे विशेष पर्यटन  सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या  पर्यटन बस  सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो.
पर्यटन बससेवा क्र. ७ द्वारे हौशी पर्यटकांना अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड),
प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी इ. धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देता येते. पीएमपीएमएल ने सुरू
केलेल्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६)
भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता येईल.
तरी पीएमपीएमएल च्या किफायतशीर दरात असणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading