श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टच्या स्वयंघोषित कार्यकारणींना धर्मादाय आयुक्त न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश
पुणे : श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टच्या स्वंघोषित कार्यकारणीने न्यायालयाच आदेशाचा अवमान केला म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. त्यानुसार स्वंघोषित अध्यक्ष विनेश प्रकाश झाड व त्यांचे कार्यकारणी मेघशाम मोतीराम झाड, मनोज मनोहर काटवे, मोनाली मनीष खेरुड, योगेश विजय साधू, अंजली निलेश खत्री, दत्तात्रय
रामचंद्र धोंडाळे, गणेश किरण खानापुरे, अजय नंदकुमार चौधरी, ऋषिकेश राजू कोल्हापुरे, किरण देविदास बुरबुरे,
आकाश अंकुश कोल्हापुरे, आदित्य जितेंद्र झाड, शुभांगी प्रवीण वाळवेकर व अनुराधा योगेश चव्हाण यांना हजर राहण्याची नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती ॲड.भारत पाचारणे यांनी दिली. संबंधित संस्थेच्या नावाच्या नावाचे बनावट लेटर पॅड, बनवून त्यावर मजकूर टाईप करुन संस्थेच्या नावाचा बनावट शिक्का तयार करुन व त्याची मोहर उठवून सहधर्मादाय आयुक्त यांचे कोर्टा जाहीर निवेदन दाखल केलेले आहे. मूळ संस्थेच्या लाभात न्यायालयाने आदेश दिलेला असताना सदरच्या आदेशाच भंग केला म्हणून माजी महिला अध्यक्ष प्रमिलाबाई पवार व गोपाळ चव्हाण यांसह इतरांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे.
