अपर्णा एंटरप्रायझेस विटेरो व्यवसाय अधिक बळकट करणार, सादर केली ३५० डिझाइन्स
पुणे : बांधकामासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडने विटेरो टाईल्स या आपल्या टाईल्स व्यवसायाचे बाजारपेठेतील स्थान बळकट करत असल्याची घोषणा केली आहे आणि त्यासाठी कंपनीने विटेरो टाईल्सची तब्बल ३५० नवी डिझाइन्स सादर केली आहेत. या धोरणांतर्गत कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार केला असून त्यामध्ये १२००X१८०० एमएम जीव्हीटी/पीजीव्हीटी, फुल बॉडी ६००X६०० एमएम आणि ६००X१२०० एमएम, ६००X३००एमएम आकाराच्या एचडी डीप पंच एलिव्हेशन टाईल्स आणि १२ एमएम जाडीच्या ४००X४०० एमएम पार्किंग/पेव्हर टाईल्स यांचा समावेश केला आहे. टाईल्स उद्योगक्षेत्रात या सर्व नवीन टाईल्स नक्कीच एक नवी क्रांती घडवून आणतील. नव्या टाईल साईझ कंपनीच्या अधिकृत डीलर्समार्फत बाजारपेठेत उपलब्ध करवून दिल्या जातील. बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने डीलर्सना अनुकूल अशा अनेक स्कीम्स सुरु केल्या आहेत, त्याबरोबरीनेच भारत व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये देखील कंपनी पदार्पण करत आहे.
या नवीन घडामोडींबाबत अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन रेड्डी यांनी सांगितले, “उद्योगक्षेत्रातील आकडेवारीनुसार[NB1], पुढील ४ ते ५ वर्षात बांधकाम साधनसामग्री विभागाचा वृद्धी दर ८ ते १२% असेल अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये वेगाने होत असलेले शहरीकरण, स्थावर मालमत्ता बाजारपेठेत आलेली तेजी, हॉस्पिटॅलिटी आणि आरोग्यसेवा क्षेत्राकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि हौस व आवड म्हणून केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये होत असलेली वाढ या सर्व कारणांमुळे मागण्यांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ या वृद्धी दरामागचे प्रमुख कारण आहे. २०२३-२८ पर्यंत भारतात टाईल बाजारपेठ जवळपास ४.१% दराने वाढत राहील. गेल्या आर्थिक वर्षात विटेरोमध्ये आम्ही १७% पेक्षा जास्त वृद्धी नोंदवली. १२००X१८०० एमएम विभागात पदार्पण केल्यामुळे आमच्यासाठी एक नवी बाजारपेठ खुली होणार आहे आणि आम्हाला पक्की खात्री आहे की, यामुळे नवे आमूलाग्र परिवर्तन घडून येईल व आम्हाला बाजारपेठेतील आमची हिस्सेदारी वाढवण्यात मदत होईल. पूर्वेकडील बाजारपेठांमध्ये विस्तार व दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये आमचे नेतृत्वस्थान अधिक बळकट करण्याबरोबरीनेच आम्ही गुजरातेतील मोरबीमध्ये एक जॉईंट व्हेंचर भागीदारी देखील केली आहे. बाजारपेठेतील वाढत्या, नवनवीन मागण्यांनुसार नवनवीन उत्पादने सादर करणे विटेरो टाईल्स यापुढे देखील सुरु ठेवेल. या लॉन्चमधून आम्ही रिटेल व्यवसायातच नव्हे तर अजून मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये देखील स्वतःचे स्थान अधिक जास्त बळकट करत आहोत.”
विटेरो टाईल्स स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गोदरेज, महिंद्रा स्पेस, एलअँडटी कन्स्ट्रक्शन, शापूरजी अँड पालोनजी ब्रिगेड, माय होम आणि एनसीसी यासारख्या अनेक दिग्गज कंपन्यांचे आघाडीचे पुरवठादार आहेत. समकालीन डिझाईन्स व सौंदर्य यांचा सर्वोत्कृष्ट मिलाप असलेल्या विटेरो टाईल्सच्या ६००X१२०० एमएमच्या रेन्जमध्य जवळपास १०० नवी कलेक्शन्स आहेत. मॅट, ग्लॉसी कार्व्हिंग आणि हाय ग्लॉसी अशा विविध विभागांमध्ये नवी डिझाईन्स सादर करण्यात आली आहेत. ग्राहकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी व गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. अजून नवनवीन डिझाईन्स, रंग आणि पॅटर्न्स शोधून काढण्यासाठी विटेरो टाईल्सची संशोधन व विकास टीम सातत्याने कार्यरत असते. बाजारपेठेत आपली प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी, नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, नव्या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी मिळावी यासाठी डिझाईन व श्रेणी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विटेरोच्या प्रत्येक टाईलची अत्याधुनिक यंत्रांमार्फत, काटेकोर प्रक्रियेचा वापर करून तपासणी केली जाते.
नवनवीन बाजारपेठांमध्ये पदार्पण करून व्यवसाय विस्तार करण्याचे आणि ग्राहकांना विटेरो टाईल्समध्ये अतुलनीय कलेक्शन्स व अतिशय तत्पर विक्रीपश्चात सेवा पुरवण्याचा अपर्णा एंटरप्रायझेसचा उद्देश आहे. भौगोलिक विस्तारामध्ये व्यापार भागीदारांसोबत हातमिळवणी करून स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये आघाडी मिळवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रात होत असलेली वृद्धी आणि नैसर्गिक सामग्रीपेक्षा वेगळी सामग्री वापरण्याकडे वाढलेला कल यामुळे टाईल्सची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ही कंपनी आपल्या ग्राहकांना बीआयएस मार्किंग्समार्फत दर्जेदार उत्पादने पुरवण्यावर व श्रेणीतील सर्वोत्तम विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करवून देण्यावर कंपनी आपले लक्ष केंद्रित करत आहे. फ्रॅन्चायजी मॉडेलच्या व्यतिरिक्त कोची, मुंबई, पुणे, ओडिशा आणि कोलकातामध्ये कंपनीच्या मालकीची शोरूम्स सुरु करण्याची कंपनीची योजना आहे.
