Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

रिसर्च प्रीमियर लीग – 2023 उद्घाटन सोहळा..

पुणे स्थित HEMRL ह्या DRDO च्या प्रयोगशाळेने आयोजित केलेल्या रिसर्च प्रीमियर लीग 2023 अंतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 मे रोजी सदर लीग चा उद्घाटन सोहळा IISER क्रिकेट ग्राउंड वर HEMRL चे कार्यकारी संचालक अरविंद कुमार ह्यांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम कप देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या HEMRL, NCL, ARAI व IISER ह्या संघानी सहभाग घेतला आहे.
“पुण्यामध्ये वेगवेगळ्या संशोधक संस्था काम करतात, त्यांना एकाच व्यासपीठावर वर आणण्यासाठी HEMRL ने चांगली सुरवात केली आहे. Research Premier League हे संघ बांधणी साठी मदत तर करेलच आणि सोबतच माहिती देवाणघेवाण साठी उपयुक्त ठरेल आणि परस्पर संवाद वाढीसाठी मदतीचे ठरेल. पुढील वर्षी संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी संस्थाना पण सहभागी करू आणि विविध खेळ प्रकाराच्या स्पर्धा पण आयोजित करू” असे मनोगत HEMRL चे कार्यकारी संचालक अरविंद कुमार यांनी व्यक्त केले. उद्घाटन सोहळा प्रसंगी डॉ सुरेश भट (NCL), व्ही. एस. खैराट (ARAI), स्वप्निल घुले (IISER), व सर्व सहभागी संघातील खेळाडू हजर होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading