Pay Fair Trophy : नाशिक जिमखाना संघाचा दुहेरी विजय !!
पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिमखाना संघाने धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमी आणि स्पेशलाईज्ड् क्रिकेट अॅकॅडमी या संघाचा पराभव करून स्पर्धेत सलग दोन विजय नोंदविले.
बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दिव्येश सालवे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर नाशिक जिमखाना संघाने धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीचा १० गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीने ११२ धावा धावफलकावर लावल्या. हे आव्हान नाशिक जिमखाना संघाने ११.४ षटकात व एकही गडी बाद न करता पूर्ण केले. समर परदेशी याने नाबाद ५२ आणि श्रेयस हेकारे याने नाबाद ३४ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
श्रेयस हेकारे याच्या नाबाद ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर नाशिक जिमखाना संघाने स्पेशलाईज्ड् क्रिकेट अॅकॅडमीचा २०४ धावांनी सहज पराभव करून सलग दुसर्या विजयाची नोंद केली. श्रेयस हेकारे याने ८१ चेंडूत १८ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ११७ धावांची खेळी केली. श्री बोंबाळे याने नाबाद ८३ धावा फटकावल्या. या दोघांनी दुसर्या गड्यासाठी १२३ चेंडूत २३४ धावांची अभेद्य भागिदारी केल्याने नाशिक जिमखाना संघाने २५ षटकात २६७ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानासमोर स्पेशलाईज्ड् क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ६३ धावांवर गडगडला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद ११२ धावा (कोविंद पराशर ३२, इशान नलावडे २३, दिव्येश सालवे ३-१०, प्रणव पाटील पाटील २-२१) पराभूत वि. नाशिक जिमखानाः ११.४ षटकात बिनबाद ११३ धावा (समर परदेशी नाबद ५२ (४४, ९ चौकार), श्रेयस हेकारे नाबाद ३४); सामनावीरः दिव्येश सालवे;
नाशिक जिमखानाः २५ षटकात १ गडी बाद २६७ धावा (श्रेयस हेकारे नाबाद ११७ (८१, १८ चौकार, १ षटकार), श्री बोंबाळे नाबाद ८३ (६७, १० चौकार), अर्जुन थोरात १-३२);(भागिदारीः दुसर्या गड्यासाठी श्रेयस आणि श्री यांच्यात २३४ (१२३) वि.वि. स्पेशलाईज्ड् क्रिकेट अॅकॅडमीः १६.३ षटकात १० गडी बाद ६३ धावा (आयुश कुंभारकर १६, अर्जुन थोरात १२, दिव्येश साळवे ३-१३, सार्थक आवारे ३-१५); सामनावीरः श्रेयस हेकारे;
