fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमूकल्याचा आईनेच काढला काटा

सांगली : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमूकल्याचा आईनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात घडली. प्रियकराच्या मदतीने आरोपी महिलेने हे कृत्य केले असून; या प्रकरणी विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28 वर्षे, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25 वर्षे, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ज्योती हिचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. मात्र ज्योती आपल्या नवऱ्यासोबत राहत नसून ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून आरोपी महिला ज्योती व तिचा प्रियकर रुपेश घाडगे याचे अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योतीचा घटस्फोट झाल्यानंतर त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र यामध्ये शौर्यचा अडथळा होत होता.

असा प्रकार आला उघडकीस ….

आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर विटा पोलिसांनी तपास केला असता ज्योती आणि रुपेशचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मात्र यामध्ये शौर्यचा अडथळा होत होता. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याची आई म्हणजे ज्योतीने दिली. याच वेळी रुपेशने शौर्यला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत फेकून दिले. पोलिसांना मृतदेह मिळाल्यानंतर त्यांनी ज्योती व रुपेशला पोलिसी खाक्या दाखवला, त्यावेळी दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading