आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या रितू फ्रान्सिसची भारतीय संघात निवड
तिसरी महिला आशियाई बेसबॉल स्पर्धा : राष्ट्रीय स्पर्धेत रीतूची चमकदार कामगिरी
पुणे : २१ मे ते २ जून दरम्यान हॉंगकॉंग येथे होणाऱ्या तिसऱ्या महिला आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या रितू शेखर फ्रान्सिसची निवड भारतीय संघात करण्यात आल्याची घोषणा भारतीय अमॅच्युअर बेसबॉल संघटनेचे सरचिटणीस हरीश कुमार यांनी केली आहे.
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, जालंधर येथे ९ ते १८ मे दरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात रितू एस. एफ. देखील सहभागी होणार आहे. रितू गेल्या सहा वर्षापासून आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करत असून यापूर्वी तिने राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण, परभणी येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण तसेच वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करताना चमकदार कामगिरी केली होती.
याच कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. रितू सध्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात एम. कॉमच्या प्रथम वर्षात शिकत असून ती बेसबॉलचा सराव डॉ. गुलजार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
रितूच्या कामगिरीसाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख यांनी रितूच्या निवडीसाठी अभिनंदन केले असून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
