Thursday, October 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

चित्रपटाच तमन्ना भाटिया आणि चिरंजीवी यांच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग सुरू

तमन्ना भाटिया 2023 मध्ये विविध प्रोजेक्ट मध्ये व्यस्त असून ती अनेक आगामी प्रोजेक्ट करत आहे. चिरंजीवी यांच्या सोबत शेड्यूल पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्री आता नवीन शेड्यूलच्या शूटिंगसाठी कोलकातामध्ये आली आहे. तमन्ना भाटिया आणि चिरंजीवी त्यांच्या पात्रांमध्ये कोलकाता मध्ये शूटिंग करताना दिसले. तमन्ना भाटियाच्या पुढील कामासाठी सगळेच उत्सुक असून ती नेहमीच नवनवीन सोशल मीडिया पोस्ट करून चर्चेचा विषय ठरते.

कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलजवळ हे दोघे स्पॉट झाले होते. कॅमेरा ऑन आणि ऑफ त्यांच्या शेड्यूलमधील काही क्षणही व्हायरल झाले आहेत. चाहते सोशल मीडियावर याबद्दल अनेक चर्चा करताना दिसतात. तमन्ना भाटिया एका वेगळ्या अवतारात यात दिसणार आहे आणि तिच्या लूकमुळे सगळयांना याची उत्सुकता आहे. तमन्ना भाटियाने याआधीही तिच्या सोशल मीडियावर काही बीटीएस शेअर केले होते ज्यात परफेक्ट शॉटच्या मागे काय घडतंय हे दाखवते.

चिरंजीवी च पात्र एक नम्र टॅक्सी ड्रायव्हरच आहे ज्याचा गूढ भूतकाळ आहे. या चित्रपटात कीर्ती सुरेश त्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे तमना भाटिया भोला शंकरच्या प्रेमाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे.

तमन्ना भाटियाकडे जी करदा, जेलर आणि लस्ट स्टोरीज हे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading