श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टच्या स्वयंघोषित कार्यकारिणीवर मनाईहुकूम
पुणे : श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार करण्यास संस्थेची स्वयंघोषित कार्यकारणी,
विनेश प्रकाश झाड व त्यांचे कार्यकारणी मेघशाम मोतीराम झाड, मनोज मनोहर काटवे, मोनाली मनीष खेरुड, योगेश विजय साधू, अंजली निलेश खत्री, दत्तात्रय रामचंद्र धोंडाळे, गणेश किरण खानापुरे, अजय नंदकुमार चौधरी, ऋषिकेश राजू कोल्हापुरे, किरण देविदास बुरबुरे, आकाश अंकुश कोल्हापुरे, आदित्य जितेंद्र झाड, शुभांगी प्रवीण वाळवेकर व अनुराधा योगेश चव्हाण यांना मनाई केली आहे.
न्यायालयाच्या आदेशाशिवाय बंधनकारक खर्चाशिवाय बँक खात्यातून रकमा काढता येणार नाहीत, असे आदेश सहधर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत, तसेच त्यांच्या विरोधात नुकसान भरपाई मागता येईल, असेही सहधर्मादाय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. श्री. सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टच्या मालमत्तेलाही कोणताही अडथळा पोहोचवू नये, असा आदेशही सहधर्मादाय आयुक्तांनी स्वयंघोषित कार्यकारणी विनेश प्रकाश झाड व कार्यकारणीला दिला आहे.
कार्यकारणीने पुर्वीच्या संस्थेच्या नावाचा, वेबसाईटचा, ८0 जीचा, संस्थेचे लेटर पॅड व संस्थेच्या नावाने बनावट शिक्के करुन वापर केला व त्या आधारे संस्थेच्या नावाने देणगीदारांकडून व समाजबांधवांकडून रोख व धनादेशद्वारे रक्कम स्वीकारुन संस्थेचे युको बँकेतील बचत खाते बंद असुन त्या बँकेत परस्पर खोटी माहिती देउन सुरु करुन रकमा काढून त्याचा गैरवापर केला. तसेच नवीन बचत खाते उघडून त्यामध्ये रकमा जमा करुन त्यांचाही गैरवापर
करुन व संस्थेची कोणतीही परवानगी न घेता संस्थेच्या नावाखाली मुंज व वधूवर सूचक व इतर कार्यक्रम करुन संस्थेचे नुकसान केले. यामुळे संस्थेच्या ज्येष्ठ महिला माजी अध्यक्षा प्रमिला वामनराव पवार व गोपाळ गणपत चव्हाण व इतरांनी सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे बेकायदेशीर कार्यकारिणीने संस्थेचे नुकसान केले म्हणून अर्ज केला होता. त्याचा निकाल देताना सहधर्मादाय आयुक्तांनी वरील आदेश दिले आहे. अर्जदारांतर्फे अँड.भारत पाचारणे यांनी काम पाहिले.
