होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने शाईनला संपूर्ण भारतात वितरित करणे चालू केले
पुणे : सामान्यांच्या दळणवळणामध्ये (मास मोबिलिटी) नवीन प्रतिमान तयार करण्याच्या दिशेने पुढे एक पाऊल टाकत होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने नरसापूर (कर्नाटक) येथील तिसऱ्या फॅक्टरीमधून शाईनच्या (shine) अखिल भारतीय वितरणास सुरुवात केली.
नवीनच लॉंच झालेल्या या मोटर सायकलला अधिकृतपणे बाजारात आणण्याचा एक विशेष समारंभ होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) चे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमू ओटानी, मानव संसाधन आणि प्रशासन विभागाचे (HMSI) वरिष्ठ संचालक श्री. विनय धिंग्रा आणि प्रॉडक्शन विभागाचे (HMSI) संचालक श्री. नवीन अवल आणि यांच्यासोबत होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) चे अन्य वरिष्ठ सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
मार्च २०२३ मध्ये लॉंच करण्यात आलेली शाईन (shine) १०० सीसी ओबीडी२ कम्प्लायंट इंजिनसह एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) आणि तब्बल १२ नवीन पेटंट अॅप्लिकेशन्ससह येते, ज्यामुळे ती भारतातील सर्वात विश्वासार्ह, किफायतशीर आणि इंधन कार्यक्षम मोटरसायकल बनते.
इतर आवश्यक वैशिष्ठ्ये आणि तंत्रज्ञानासह अभियांत्रिकी असलेली शाईन चालकांना अत्यंत आराम सुविधा, टिकाऊपणा आणि शोभिवंत शैली देते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्याच्या परिस्थितीत त्यांची राइड् आनंददायी बनते.
स्टायलिश आणि अष्टपैलू अशी शाईन पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: लाल पट्ट्यांसह काळा, निळ्या पट्ट्यांसह काळा, हिरव्या पट्ट्यांसह काळा, सोनेरी पट्ट्यांसह काळा आणि राखाडी पट्ट्यांसह काळा. याची किंमत ६४,९०० फक्त एवढी आहे (एक्स-शोरूम महाराष्ट्र).
