Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

तो पुन्हा येतो आहे ! आता खुपणार नाही तर टोचणार !

प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने आणि प्रेमामुळे झी मराठीचा मंच प्रेक्षकांच्या आनंदासाठी सतत काही ना काही नवीन, दर्जेदार सादर करतच असतो. पुन्हा एकदा झी मराठी बऱ्याच काळानंतर म्हणजेच जवळपास १० वर्षानंतर एक जबरदस्त व अफलातून कार्यक्रम आपल्या भेटीस आणत आहे आणि तो बहूचर्चित कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. परत एकदा तो येणार आणि सगळ्यांची गुपित उलगडणार आहे.

नावावरून तर प्रेक्षकांच्या लक्षात आलच असेल की ती खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे ते आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अवधूत गुप्ते. खुपते तिथे गुप्तेच हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास ‘खुर्ची’ हो खुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय, मग ते नॊकरीमध्ये असो, कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण. ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत त्यांना गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही तर टोचणार आहेत.

त्यामुळे आता आली रे आली आता तुमची बारी आली, तेव्हा तयार राहा येत आहे ‘खुपते तिथे गुप्ते’, लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading