Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

केंद्रातील सहकारी संस्थांसह भारताला “जगातील डेअरी” म्हणून स्थापित करा

पुणे: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारतीय डेअरी क्षेत्रामध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या (एनडीडीबी) उपक्रमांचे कौतुक केले आणि डेअरी बोर्डाला  दुग्धव्यवसायाची क्षमता नसलेल्या पंचायती व गावांमध्ये व्यवहार्य डेअरी सहकारी संस्था स्थापन करण्यात प्रमुख भूमिका बजावून सहकारी दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्यास सांगितले.

बहु-वस्तू सहकारी संस्था, सहकारी संस्थांच्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी समान ब्रँड, सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन, सहकारी संस्थांमधील सहकार्याने दूध प्रक्रिया सुविधांचा उत्तम क्षमतेचा वापर, डेअरी मशिनरी निर्मितीमध्ये स्वावलंबन आणि एनडीडीबीची उपकंपनी आयडीएमसी लिमिटेड मार्फत स्वदेशी डेअरी उपकरणांची निर्यात या गोष्टींवरही प्रकाश टाकला. हे साध्य करण्यासाठी एनडीडीबी च्या सहाय्यक कंपन्यांनी आघाडीची आणि उत्कृष्ट भूमिका बजावली पाहिजे, असेही अमित शहा यांनी सांगितले.

मीनेश शाह, एनडीडीबीचे अध्यक्ष यांनी कोऑपरेशन सेक्रेटरी ज्ञानेश कुमार; जॉइंट सेक्रेटरी पंकज कुमार बन्सल, आणि एनडीडीबी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सुश्री वर्षा जोशी; एडिशनल सेक्रेटरी (दुग्ध विकास), पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग; भारत सरकार,शामलभाई बालाभाई पटेल; चेअरमन, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड;  निहाल चंद शर्मा, चेअरमन, हिमाचल प्रदेश कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लि. आणि कामधेनू विद्यापीठाचे वाइस चान्सलर डॉ.एनएच केलावाला आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना शहा म्हणाले,  शेजारील देश आणि आफ्रिकन राष्ट्रांमध्ये दुग्धव्यवसाय बळकट करण्यासाठी एनडीडीबी च्या उपक्रमांची प्रशंसा केली, आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीद्वारे भारताला “जगातील डेअरी” बनण्याची गरज असल्याचे सांगितले. यामुळे माननीय पंतप्रधानांचे वसुधैव कुटुंबकमचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल.

चेअरमन, एनडीडीबी यांनी भारताच्या डेअरी क्षेत्राविषयी माहिती दिली आणि एनडीडीबी चे उद्दिष्ट पुढे  नेण्यासाठी काय केले हे सांगितले, जसे एनडीडीबी चे ‘फार्मर्स फर्स्ट’ व्हिजन हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी सहकारी धोरणे, शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या वैज्ञानिक दुग्ध व्यवसाय पद्धती, एनडीडीबी च्या उपकंपन्यांचे दुग्ध सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी केलेले प्रयत्न, ज्यामुळे करोडो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे इत्यादी. एनडीडीबी चे चेअरमन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी माननीय मंत्र्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आणि डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading