Corona update : सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आकराशेच्या पुढे
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भारतात गेल्या २४ तासात १२ हजार ५९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात सध्या ६५ हजार २८६ सक्रिय रूग्ण आहेत. तर महाराष्ट्रात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णसंख्या ही आकराशेच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 1 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन कोरोना रुग्णसंख्ये बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ही 6 हजार 129 झाली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असली; तरी या वाढत्या रूग्ण संख्येसोबत लोकांचे मृत्यूचे आणि हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
COVID-19 | 1,113 new cases and 3 deaths reported in Maharashtra today; Active cases stand at 6,129 pic.twitter.com/Vz9CweMPLY
— ANI (@ANI) April 20, 2023
