Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

युवोत्सव २०२३ कार्यक्रमात सादर होणार युवा कलाकारांचा कलाविष्कार

पुणे : तरुण पिढीला कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी स्वरनिनाद संस्थेतर्फे युवोत्सव २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि नृत्य अशा तिन्ही कलांचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम शनिवार, २२ व रविवार, २३ एप्रिल रोजी टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉल येथे होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दोन्ही दिवस सायंकाळी ६ वाजता असणार आहे. तसेच कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असणार असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. मात्र काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यक्रमात २२ एप्रिल रोजी शार्दुल काणे ( गायन), आलापिनी निसळ ( कथक नृत्य), चिन्मय लेले (तबला सोलो) आणि सानिका कुलकर्णी ( गायन) हे कलाकार, तर २३ एप्रिल रोजी करण देवगावकर ( गायन), सागरिका पटवर्धन( भरतनाट्यम नृत्य), अभेद अभिषेकी ( गायन) आणि मेहताब अली नियाझी (सतार सोलो) हे कलाकार आपली कला सादर करतील. त्यांना हार्मोनियमसाठी गंगाधर शिंदे, यशवंत थिटे हे कलाकार, तर तबल्यासाठी कार्तिक स्वामी, रोहित मुजुमदार, गीत इनामदार आणि निखील हरिश्चंद्रकर हे कलाकार साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading