Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच – अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई : ‘कारण नसताना माझ्याबद्दल व सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत,’ आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबरच आहोत. आम्ही सर्वजण राष्ट्र्वादीतच आहोत, असे म्हणत सुरु असलेल्या राजकीय चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह अनेक आमदार त्यांच्याबरोबर होते. त्यांनी विधानभवन येथे माध्यमांशी संवाद साधला आहे. अजितदादा यांनी ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ वितरणावेळी झालेल्या प्रकारावरूनही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अजितदादा पवार हे भाजपात जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘माझ्याबद्दल सुरु असलेल्या बातम्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेत तथ्य नाही. आमदारांच्या सह्या घेतल्या असे सांगितले जात आहे. मात्र तसे काहीही झालेले नाही. आम्ही सर्वजण राष्ट्र्वादीसोबतच आहोत. अनेक आमदार आज त्यांच्या कामासाठी आलेले होते. माझ्याबद्दल ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत. त्या चुकीच्या आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. राजकारणात सत्ता येते जाते. अशा चर्चेमुळे सध्या देशात अनेक प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading