Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

होर्डिंग कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे :  कात्रज-देहुरोड सर्व्हिसरोडवर किवळे येथे उभे असलेले  होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये 5 जणांचा मृत्यू तर 3 जण  गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनस्थाळी दाखल झाले असून रुग्णवाहिका तसेच अग्निशमनदल देखील दाखल झाले आहे. सहा क्रेनच्या साह्याने जमिनीवर पडलेले होर्डिंग बाजुला करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आडोसा घेतला. मात्र, वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात सात ते आठ जण अडकले होते. तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीमने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. बचाव पथकाने एका जणाला होर्डिगखालून सुखरुप बाहेर काढले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

मृतांची नावे –

अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड)
शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड)
वर्षा केदारे (वय 40, शितळानगर, देहूरोड)
भारती मंचळ (वय 30, शितळानगर, देहूरोड)
राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश)

जखमींची नावे –

विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश)
रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे)
रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading