Monday, October 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कर्नाटक : राष्ट्रवादी कॉँग्रेस घड्याळ चिन्हावर लढणार विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.  राष्ट्रवादी कडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत.  निवडणूक आयोगाच्या या  निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. 

निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कर्नाटक निवडणुकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी म्हणाले, आम्ही कर्नाटक मध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार आहोत. आमचे चिन्ह फ्रिज झाले होते. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे सध्याचा भाजपचा आमदार दोन दिवसांपूर्वी आला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारे आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. २३ वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे. २०१४, २०१९ च्या दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतर २१ पैकी १२ राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरला, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल आयोगाने काढून घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading