Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ‘ही’ महिला लढवणार निवडणूक

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा, बॉस फेम व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या आता राजकारणात उतरणार आहेत. कारण नुकतेच त्यांनी  बारामतीतून लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले आहे. या विषयी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी कधीच कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. बारामतीत 15 वर्षांपासून घराणेशाही सुरु आहे. मात्र आता बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाने संधी दिली तर मी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार, असे स्पष्ट संकेत तृप्ती देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध तृप्ती देसाई अशी लढत पाहायला मिळू शकते.

तृप्ती देसाई या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने त्या भारतीय जनता पक्षात जाणार का अशी चर्चा होवू लागली आहे. मात्र या चर्चां पूर्णविराम देत तृप्ती देसाई यांनी आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे असेही सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय पक्षानं जर मला संधी दिल्यास मी ती ऑफर नाकारणार नाही ही देखील देसाई यांनी आवर्जून सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading