Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

लीड्स डेकेट विद्यापीठातील कार्णेजी स्कुल ऑफ स्पोर्टस च्या विद्यार्थ्यांची पुण्याला भेट

पुणे : लीड्स डेकेट विद्यापीठातील कार्णेजी स्कुल ऑफ स्पोर्टसचे 20 विद्यार्थी 3 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीसाठी पुण्यातील आयएसएमएस कॉलेजला भेट देणार आहेत. आयएसएमएस व कार्णेजी स्कुल यांच्यात झालेल्या परस्पर सामंजस्य करारानुसार ही भेट होणार आहे.
परस्पर सामंजस्य करारा अंतर्गत कार्णेजी स्कुलचे विद्यार्थी भारताला भेट देत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय क्रिडा संस्कृती तसेच, खाजगी व शासकीय क्रिडा उद्योग यासंदर्भात या भेटी दरम्यान जाणून घेण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न राहील. काही तज्ञासोबत झालेली चर्चासत्रे तसेच भारतातील व्यावसायिक क्रिडा संस्थांना भेट देताना योगा सारख्या प्राचीन भारतीय आरोग्य संस्कृतीतील वैशिष्ट्ये तसेच मैत्रीपुर्ण सामने आणि भारतातील महाविद्यालयीन युवकांबरोबर गिर्यारोहण, क्रिडा व्यवस्थापन स्पर्धा, वंचित नागरिकांच्या विकासासाठी सामाजिक उपक्रमांना भेट या बरोबरच ऐतिहासिक ठिकाणांना भेट व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील क्रिडा व सामाजिक संस्कृती समजावून घेण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न राहणार आहे.
या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत अभिनव बिंद्रा फाऊंडेशन यांसारख्या तज्ञांसह चार अभ्यास सत्रे तसेच काका पवार कुस्ती केंद्र, पीडीएमबीए व बालेवाडी स्टेडीयमला भेट देत तेथील चर्चासत्रात सहभाग असा कार्यक्रम राहणार आहे. पुण्याच्या भेटीत येथील संस्कृती व इतिहास जाणून घेतानाच रुचकर महाराष्ट्र भोजनाचा आस्वादही त्यांना घेता येईल. सिंहगडाला दिलेल्या भेटीतून त्यांना इतिहासाची सफर करता येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयएसएमएस येथे विद्यार्थ्यांच्या टीम तर्फे ढोल ताशा पथक व सांस्कृतिक कार्यक्रम असा भव्य स्वागत समारंभ आयोजित केला आहे.
आयएसएमएसच्या संचालिका शालिनी बॅनर्जी म्हणाल्या की, हे परदेशी विद्यार्थी भारतीय क्रिडा संस्कृती जाणून घेत असताना आमच्या विद्यार्थीना त्यांच्याशी संवाद साधून परदेशी नागरिकांचा दृष्टिकोन जाणून घेता येईल. त्यामूळे आपले कौशल्य व ज्ञान भर घालता येईल. क्रिडा क्षेत्र ही संपूर्ण जगाची भाषा असुन सामाईक लक्ष्य असलेल्या सर्वांना प्रेरणा देण्याची क्षमता तसेच नेतृत्वविकास, संवाद कौशल्य आणि स्पर्धात्मकता या गुणांमध्ये प्रगती करुनन युवकांना आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यास साहाय्य होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading