fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

स्वाती कानडे यांनी निर्माण केला सौर ऊर्जेवरील स्मार्ट कुकर

पुणे : महिला उद्योजिका स्वाती कानडे यांनी सौर ऊर्जेवर व विद्युत वर चालणाऱ्या स्मार्ट कुकरची (solar powered smart cooker) निर्मिती करुन एक नवा इतिहास निर्माण केला असल्याची भावना पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केली आहे .दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या वतीने आयोजित केलेल्या महिला उद्योजिका परिषदेत या कुकरचे उद्घाटन करण्यात आले . (Swati Kanade created solar powered smart cooker)

या कुकारचे वैशिष्टे म्हणजे या कुकरमध्ये 40 प्रकारचे पदार्थ बनविले जातात .हा कुकर कोठेही घेऊन जाऊ शकता. स्टार्ट अप इंडिया ने प्रमाणित केले आहे.

या कुकरची निर्मित स्वाती कानडे यांनी अनेकम या संस्थेच्या माध्यमातून केली आहे .या उत्पादना ला पेटंट मिळाले असून याबाबत कानडे यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले . या कुकरचे उत्पादन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे .सर्वसामान्य महिलांना या कुकरविषयी आतुरता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे .या कुकराचे उत्पादन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे .
यावेळी डिक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे ,राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा ,प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर ,सीमा कांबळे ,निवेदिता कांबळे ,स्वाती कानडे ,प्रवीण कांबळे ,विजय मोहिते , यासह दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी महिला व उद्योजिका मोठ्या प्रमानात उपस्थित होते .

Leave a Reply

%d