fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRA

समाज ऋणातून उतराई होण्यासाठी नेहमीच आपले विकासासाठी प्रयत्न – आमदार लोणीकर

परभणी : समाजात गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला मुलींचे विवाह हे सामूहिक विवाह सोहळ्यातच करणे ही काळाची गरज आहे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून हजारो मुलींचे कन्यादान केल्याने मंत्री पदा पर्यंत पोहोचण्याचा आशीर्वाद मिळाला सामूहिक विवाह सोहळा सोहळ्यात विवाह करणाऱ्यांचे जीवन सोन्यासारखे उजळते हा स्वतः घेतलेला सामूहिक विवाह सोहळ्यातील अनुभव आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. 

अक्षदा मंगल कार्यालयात 5 मार्च रोजी दुपारी बारा वाजता माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सोनार समाजाचे राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक चंद्रकांत ढाळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार  सुरेशराव जाधव ह भ प मौनी उर्फ अंबादास दहिवाळ महाराज भाजपा महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, डॉक्टर प्रफुल्ल पाटील, गोविंद अजमेरा, धनराजजी विसपुते, सुधाकरराव धानोरकर, अनिल शेठ, प्रभाकर कुलथे, कृष्णा अष्टीकर, नितीन अष्टीकर, बालाजीराव उदावंत, सुवर्णा ताई लोलगे, दिलीप शहाणे, अजय डहाळे, अशोकराव डहाळे, प्रकाशराव मोरे, हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिभेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. आयोजक चंद्रकांत डहाळे व अक्षय डहाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सन्मानपत्र व भव्य असे पुष्पहार आणि सत्कारमूर्ती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सन्मान करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना आयोजक चंद्रकांत डहाळे म्हणाले की लोणीकर यांच्यामुळे भाजपा पक्षात काम करण्याची संधी मिळाली लोणीकर हे दिलेले शब्द पाडणारे नेते आहेत सोनार समाजाचे अनेक प्रश्न असून या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे त्यासाठीच समाजाचे राज्य अधिवेशन घेण्याचा मानस असून या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा मानस आहे वधू वर परिचय मेळावा हा केवळ गरिबांसाठी असतो ही मानसिकता बदलायला हवी या मेळाव्यात प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी जोडीदार निवडून सामूहिक विवाह सोहळ्यातच विवाह सोहळा करावा ही काळाची गरज असल्याचे चंद्रकांत डहाळे यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की विवाह घडून आणण्यासाठी गरिबांचे घर शेती जाते अनेक पालक कर्जबाजारी बनतात हे थांबवायला पाहिजे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन झाले पाहिजे सोनार समाज हा शंभर नंबरी जरी असला तरी देखील या समाजातही अनेक लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी चंद्रकांत ढाळे यांच्यासारखे रत्न समाजसेवेत कार्यरत राहिला हवेत चंद्रकांत डहाळे, हे माझ्या हजार मित्रांपैकी एक आहेत त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ राहील असा विश्वास त्यांनी देऊन सन्माना बद्दल आयोजकाचे आभार मानून वधू वर परिचय व विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वधू-वरांना शुभेच्छा दिल्या या युवा सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने सोनार समाज बांधव ही उपस्थित होता.

Leave a Reply

%d bloggers like this: