राष्ट्रवादी कॉँग्रेसचा नागालँडमध्ये २ जागांवर विजय
कोहीमा : महाराष्ट्रात झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. तसेच नागालँड विधानसभा निवडणुकीट (Nagaland Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party)खाते उघडले आहे.
नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवला आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. दरम्यान नागालँडमध्ये राष्ट्रीय संयुक्त पुरोगामी पक्षाला १० जागांवर विजय मिळाला असून एकूण १४ जागांवर आघाडी आहे. भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून ९ जागांवर आघाडी आहे.
