Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PMRDA – म्हाळुंगे माण नगर रचना योजनेच्या फेरबदला बाबत लवादाची सुनावणी उद्यापासून

पुणे : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 72 अनुसार फेरबदला प्रमाणे म्हाळुंगे माण प्रारुप नगर रचना योजना क्र. 1 ही योजना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) दि. 31.12.2022 च्या अधिसूचने प्रमाणे मंजूर केली आहे. म्हाळुंगे माण ही प्रारुप नगर रचना योजना क्र.01 साठी लवाद म्हणून एस.जी. पाटील यांची नियुक्ती दि. 20/09/2022 रोजी झाली आहे. प्राथमिक /अंतिम न.र.यो. तयार करण्यापूर्वी सर्व संबंधितांना वैयक्तिक सुनावणी देणेकरीता लवाद यांनी खालील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे .

सुनावणीची दिनांक अंतिम भूखंड क्र.
01/03/2023 1 ते 19
02/03/2023 20 ते 34
03/03/2023 36 ते 58
20/03/2023 60 ते 75
21/03/2023 77 A ते 92
23/03/2023 95 ते 110 B
24/03/2023 116 ते 137
03/04/2023 138 B ते 149
05/04/2023 150 ते 156
06/04/2023 161 C ते 167
10/04/2023 170 ते 179
11/04/2023 182 ते 197 B
12/04/2023 201 A ते 215
13/04/2023 223 ते 240
17/04/2023 244 ते 225
18/04/2023 261A ते 275 C
19/04/2023 277 ते 288
20/04/2023 292 ते 302
21/04/2023 76,77,94,111 ते 115, 138, 138A, 157 ते 160, 168
24/04/2023 170,180,181,198 ते 201, 216 ते 222, 241,242
त्यानुसार नमुना क्र.4 ची विशेष सूचना जमीनमालकांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष अथवा पोस्ट कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेली आहे. वरील सुनावणीचा तपशील प्राधिकरणाचे संकेतस्थळ http://www.pmrda.gov.in येथे उपलब्ध केलेला आहे. तसेच मौजे म्हाळुंगे-माण येथील पूर्वीची ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत येथे सुध्दा सदर तपशील उपलब्ध केलेला आहे. तरी सदर सुनावणी कार्यक्रमानुसार संबंधितांनी नियोजित दिनांकास व वेळेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी इमारत, आकुर्डी रेल्वेस्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे-44 कार्यालयातील लवाद विभागात उपस्थित रहावे असे आवाहन योजनेचे लवाद शिवराज पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading