Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे :  पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेच्या ७ पदाधिका-यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ५० मनसैनिकांनी आपले राजीनामे दिल्याची माहिती आहे. मनसेने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. एकाचवेळी ५० पदाधिका-यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

पुण्यातील कसबा निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. कसब्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारात काही मनसैनिक सामील झाले होते. धंगेकरांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षातील स्थानिक नेत्यांना मिळाली. त्यामुळे शहराध्यक्षांनी पत्र काढत ७ जणांची हकालपट्टी केली. त्यानंतर थेट ५० जणांनी राजीनामे दिले आणि धंगेरकांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. मात्र प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळतील याचा वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करा असे मनसेकडून सांगण्यात आले होते.

कसब्यात महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेनं रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची हकालपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मनसैनिकांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मनसे नेमके कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचे मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असे मनसैनिकांना सांगण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading