Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामांचा आढावा

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने कामकाजाचा तसेच मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र या ठिकाणच्या सुविधांचा आढावा निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण यांनी घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय थेरगांव येथे आयोजित बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा देण्यात याव्यात. एकाच जागी दोन मतदान केंद्र असल्यास तेथे दुभाजक व्यवस्था उभारताना आवश्यक सर्व काळजी घ्यावी आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.

मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम चोखपणे करावे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांशी सौजन्याने वागावे, मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न उद्भवल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना  ढोले यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस मतदान कामकाजाचे साहित्य वाटप आणि स्वीकृत करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading