Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता -अजित पवार

पुणे: नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. तांबे यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. त्यांनी अपक्ष अर्ज भरल्याने काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबितही केलं होतं.सत्यजित तांबेंना तिकीट मिळावं म्हणून पडद्यामागून अनेक हालचाली झाल्या होत्या. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मैदानात उतरले होते. शरद पवार यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता. तसा गौप्यस्फोटच राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जो कुणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार आहे. अजिबात बिनविरोध निवडणूक होणार नाही, असंही ते म्हणाले.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जो कुणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तसेच दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार असून मी माझे पत्ते बाहेर काढणार नाही. मी माझ्या पद्धतीने काम कऱणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
2017 ला पिंपरीत माझा पराभव झाला याची खंत आजही आहे. माझेच सहकारी तिकडे गेले… म्हणून हे सगळं घडलं होतं. हिंजवडीतल्या आयटी वोटरनं मोदी प्रेमात भाजपला निवडून दिलं… त्या लोकांनी कमळ निवडून आणलं म्हणून पीसीएमसीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. तसंच त्यावेळी भाजपने प्रभाग फोडले होते. मी पण यावेळी तसंच केलं होतं, पण सत्ताबदल झाला आणि निवडणूक लांबली.नाहीतर यावेळी पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर दिसला असता.असअजित पवार म्हणाले. अजित पवारांनी सत्तेत असताना प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading