Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

मालपाणी पँथर्स – सॅटिओ सुप्रिम्समध्ये रंगणार फायनल

पुणे: मालपाणी पँथर्सआणि सॅटिओ सुप्रिम्स यांच्यात न्याती माहेश्वरी सिक्स-अ-साइड फुटबॉल लीगमधील १२ ते १६ वयोगटाची अंतिम लढत रंगणार आहे. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत पँथर्स संघाने एच. एच. गोट्स संघावर ३-० ने मात केली. यात क्षीतिजलोहीने तिन्ही गोल केले. दुस-या उपांत्य लढतीत सॅटिओ सुप्रिम्स संघाने एमएएलाइफस्टाइल माव्हरिक्स २-१ ने विजय मिळवला. यात सॅटिओ सुप्रिम्स संघाकडून हर्ष आणि अमन यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर माव्हरिक्स संघाकडून कैरव हेदाने एक गोल केला.

निकाल – १२ ते १६ वयोगट – गटातील लढती – लाईफस्टाइल माव्हरिक्स – ३ (कैरव हेदा १ , प्रसाद १,वेदांत लाखो १) वि. वि. एनपीएव्ही निंजाज – २ (नैतिक लाखो २), सॅटिओ सुप्रीम – ५ (साहिल कारवा ३, रोहित भुतडा २) वि. वि. पास वॉरियर्स -०, मालपाणी पँथर्स – २(क्षीतिज लोहिया २) वि. वि. एनपीएव्ही निंजाज – १ (नैतिक लाखो १).

मुली – खुला गट –एसएमजी हंटर्स – २ (सेजल २) वि. वि. एमडीके विकिंग्ज – १ (साची मुंदडा 1), मंत्रीअँड डॉटर्स – ३ (मेघल मुंदडा ३, नीरजा बजाज १) वि. वि. सोमनी डायनामोज – १ (केसरकोगटा १), एमडीके विकिंग्ज – १ (आर्या जाजू १). वि. वि. मंत्री अँड डॉटर्स – ०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading