Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांना पुणेकरांतर्फे मानवंदना

पुणे : जम्मू येथे अतिदहशग्रस्त भागात सुरुंग काढण्याचे काम करीत असताना वीरमरण आलेल्या सदाशिव पेठेतील कॅप्टन सुशांत गोडबोले यांना पुणेकरांनी मानवंदना दिली. वीरमातेचे करतो रक्षण, सैनिका त्रिवार तुझ वंदन… असे म्हणत भारत माता की जय… च्या जयघोषात गोडबोले यांच्या २० व्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्तंभाला नमन करण्यात आले.

सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या महाराणा प्रताप उद्यानातील स्मृतीस्तंभ परिसरात मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोडबोले यांचे वडिल चंद्रकांत गोडबोले, अशोक मेहेंदळे, शाहीर हेमंत मावळे, आनंद सराफ, शुभांगी आफळे, रवींद्र रणधीर, अजित चंदेल यांसह नवचैतन्य हास्यक्लबचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीताचे समूहगान देखील करण्यात आले.

आनंद सराफ म्हणाले, सन २००१ ते २००३ या कालावधीत आॅपरेशन पराक्रम अंतर्गत जम्मू येथे कॅप्टन सुशांत गोडबोले यांनी अतिदहशतग्रस्त असलेल्या विभागात २३ किलोमीटर लांब व २५ मीटर रुंदीचा रणगाडा विरोधी सुरुंग पेरण्याचे काम २ महिन्यात पूर्ण केले. त्यानंतर पुढील २६ दिवसात काही भाग काढून झाला. मात्र, पुढील टप्प्यात रणगाडा विरोधी सुरुंग काढताना झालेल्या स्फोटात २९ जानेवारी २००३ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना जम्मू येथे वीरगती प्राप्त झाली. सैनिकांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सातत्याने होत रहावे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading