सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे : भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिम्मित्ताने संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी भारतीय नौसेनेचे माजी कमांडर शिशिर सहाय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ . स्वाती मुजुमदार,सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग ट्रस्टी संजीवनी मुजुमदार ,सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ . गौरी शिऊरकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि सिंबायोसिस ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणप्रदर्शनांचे सादरीकरण केले . यावेळेस देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
