fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यीनींचे प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर नृत्य सादरीकरण

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनीनी प्रजासत्ताकदिनी “कर्तव्यपथ’ असे नामकरण झालेल्या नवी दिल्ली येथील पथसंचलनामध्ये शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले.

कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्यातील ‘पन्च् तत्वाततून नारी शक्ति’ हा विषय होता. कथक या शास्त्रीय नृत्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांनींची स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ऑडिशननंतर निवड झाली.

पुण्यातील २६ विद्यार्थीनींची यामध्ये निवड झाली होती. यामध्ये रुचा रानडे, अर्पिता भिडे, अर्पिता रोकडे, अनुषा बावनकर, सई गोखले, रमणी भालेराव, ईशा रानडे, मृणाल वैद्य, आर्वी बेंद्रे, श्रुती घोरपडे, कीर्ती कुरंडे, आयुषी डोबरिया, चैत्राली उत्तुरकर, वैष्णवी निंबाळकर, रेवती देशपांडे, साहिष्णुता राजाध्यक्ष, शमिका खापरे, मैथिली पुंडलिक, नंदिनी कुलकर्णी, अपूर्व मुळ्ये, साक्षी जोशी, स्वरूपा भोंडे,  हिमांशी झंवर, मधुरा इनामदार, समृद्धी लेले या विद्यार्थीनींनी कर्तव्यपथावर सादरीकरण केले.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथात सांस्कृतिक सामर्थ्याचं दर्शन झाले. भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथासमोर शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण झाले. यामध्ये पुण्यातील चार समूहांची निवड झाली होती. यामध्ये भारती विद्यापीठातील विद्यार्थीनींनी देखील सादरीकरण केले आहे. पुण्यातील विद्यार्थींनींची सादरीकरणासाठी निवड होणे हे अभिमानास्पद आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading