राजरत्न बुद्ध विहार सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व मुलांना खाऊचे वाटप
निगडी :- राजरत्न बुद्धविहार सेवाभावी संस्था यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व लहान मुलांना खाऊचे वाटप कार्यक्रम संपन्न. यावेळी मिलिंद नगर, निगडी येथील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर शिंगे, पांडुरंग शिंदे, मच्छिंद्र गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, शिवपुत्र मुकादम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन राजरत्न बुद्ध विहार कमिटी यांच्या वतीने रमेश गायकवाड (अध्यक्ष) सुरज गायकवाड, (कार्याध्यक्ष) शिवशरण हिप्परगिकर (संस्थापक) बळीराम वाघमारे (उपाध्यक्ष)सन्मुख हादी मनी (सचिव) शिवशरण गायकवाड (खजिनदार)सदस्य:- अशोक कदम, भीमराव गवळी, फकीरप्पा आळंद, रमेश सूर्यवंशी, परमेश्वर हादीमनी, आदींनी सदरील कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निगडी पोलीस ठाण्याचे पीएसआय नाथा केंकन हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरज गायकवाड यांनी केले व सन्मुख हादीमनी यांनी आभार व्यक्त केले.
तसेच निगडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाटेकर, दिपक भालेराव, शिवाजी साळवे, उमाकांत गायकवाड, आदी मान्यवर तसेच निगडी परिसरातील महिला भगिनी व जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. यावेळी संविधान प्रास्ताविकचे सामूहिक वाचन तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले…
